महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भाजप पुन्हा सत्तेत आले म्हणून मुस्लिमांनी घाबरू नये - ओवैसी - Muslims

आम्ही देशात भाडेकरू म्हणून नाही तर बरोबरीचे हिस्सेदार आहोत, असे ओवैसी यांनी सांगितले.

असदुद्दीन ओवैसी

By

Published : Jun 1, 2019, 3:07 PM IST

नवी दिल्ली- लोकसभेत ३०० जागा मिळाल्या म्हणून वाट्टेल ते करू, असे जर पंतप्रधानांना वाटत असेल तर ते शक्य नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार आम्ही तुमच्यासोबत लढत राहू, असा इशार एआयएमआयएमचे अध्यक्ष खा. असदुद्दीन ओवैसी यांनी मोदींना दिला आहे.

आम्ही भारताचे नागरिक आहोत. भारत स्वतंत्र आहे आणि त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आम्ही सतत प्रयत्नशिल राहू. आम्ही भारतात भाडेकरू म्हणून नाही तर बरोबरीचे हिस्सेदार आहोत, असे ओवैसी यांनी सांगितले. मुस्लिमांनी भाजप सत्तेत आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही. संविधानाने प्रत्येक धर्माला आपले धार्मिक स्वातंत्र्य जपण्याचा अधिकार दिला आहे. त्या अधिकारांसाठी असदुद्दीन ओवैसी सतत लढत राहील, असेही ते म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details