महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

काँग्रेसला मुस्लीम लीग नावाच्या विनाशकारी व्हायरसची लागण - योगी - congress

'१८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकत्र येऊन लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की, देशाची फाळणी झाली. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या वेगाने संक्रमित व्हायरसपासून सावधान रहावे,' असे योगींनी म्हटले आहे.

योगी आदित्यनाथ

By

Published : Apr 5, 2019, 8:21 PM IST

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी मुस्लीम लीग हा विनाशकारी (डेडली) व्हायरस आहे, अशी टीका ट्विटद्वारे केली आहे. आता काँग्रेसलाही या व्हायरसची लागण झाली आहे, असे ते म्हणाले. काँग्रेस आणि मुस्लीम लीगने मिळून ही निवडणूक जिंकली तर, संपूर्ण देशभरात याची लागण होईल, असे ते म्हणाले.


यापाठोपाठ दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी १८५७ चे उदाहरण देत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. '१८५७च्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडेसह संपूर्ण देश इंग्रजांविरोधात एकत्र येऊन लढला होता. नंतर हा मुस्लीम लीगचा व्हायरस आला आणि असा पसरला की, देशाची फाळणी झाली. आज पुन्हा तीच टांगती तलवार डोक्यावर आहे. पुन्हा एकदा हिरव्या झेंड्याची लाट आली आहे. काँग्रेस आणि मुस्लीम लीगच्या वेगाने संक्रमित व्हायरसपासून सावधान रहावे,' असे योगींनी म्हटले आहे.


राहुल गांधींनी गुरुवारी केरळमधील वायनाडमधून उमेदवारीचा अर्ज भरला. या भागात मुस्लीम लीगचे वर्चस्व आहे. काँग्रेस केरळमधील २० पैकी १६ जगांवर निवडणूक लढवणार आहे. ४ जागा त्यांनी आघाडीतील मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत. यातील २ जागा इंडियन युनियन मुस्लीम लीग (आययूएमएल) आणि उरलेल्या दोन जागांपैकी एक-एक जागा केरळ काँग्रेस (मानी) आणि सोशालिस्ट पार्टी (आरएसपी) यांच्यासाठी सोडण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details