महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'मुस्लिम' एका दिवसासाठी झाले 'हिंदू', जानवे घालून ब्राह्मणावर केले अंत्यसंस्कार - Savarkundala Hindu-Muslim news

गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात, एका वृद्ध ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याला काही मुस्लीम तरुणांनी खांदा देत, त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले. विशेष म्हणजे, यावेळी या सर्व तरुणांनी जानवे देखील घातले होते. सध्या सगळीकडे या घटनेची चर्चा आणि कौतुक सुरु आहे.

Muslim brothers give Brahmin 'uncle' a Hindu cremation

By

Published : Sep 16, 2019, 5:35 PM IST

Updated : Sep 16, 2019, 7:13 PM IST

गांधीनगर - आपल्या देशाबद्दल सांगायचे झाल्यास आपण अभिमानाने सांगतो की हा विविधतेने नटलेला देश आहे. या विविधतेत एकता ही आपली ओळख आहे. याचेच उदाहरण गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात पाहायला मिळाले. एका वृद्ध ब्राह्मणाचा मृत्यू झाल्यानंतर, त्याला काही मुस्लीम तरुणांनी खांदा देत, त्याच्यावर हिंदू पद्धतीने अंतिम संस्कार केले. विशेष म्हणजे, यावेळी या सर्व तरुणांनी जानवे देखील घातले होते.

उमरेलीमधील सावरकुंडला गावात भिखाभाई कुरेशी आणि भानुशंकर पंड्या हे दोन मित्र एकत्र राहत होते. भिखाभाई कुरेशी यांच्या निधनानंतर भानुशंकर पंड्या हे एकटे पडले होते. वृद्धापकाळाने भानुशंकर यांचेही निधन झाले. त्यानंतर भिखाभाई यांच्या मुलाने, आपल्या मित्रांसमवेत भानुशंकर यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा : संकल्पातून उभे केले किचन गार्डन, कोथामंगलम पंचायतीच्या सरपंचांचा यशस्वी प्रयोग

सावरकुंडला गावात पहिल्यापासूनच सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. अशा प्रकारच्या घटनांमुळेच, सारे भारतीय हे माझे बांधव आहेत' या उक्तीवरील विश्वास आणखी वाढत असल्याची चर्चा परिसरात होती.

हेही वाचा : अहमदनगर: बैलाने घेतला सोन्याचा घास; दागिन्यासाठी गृहिनीला सासरचा धाक

Last Updated : Sep 16, 2019, 7:13 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details