कोलकाता -पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादच्या बहरामपूर गावातील रहिवासी असलेल्या गौतमचंद्र विश्वास यांनी 'नमामि गंगे' मोहिमेला आपल्या जीवनाचे ध्येय मानले आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गौतमचंद्र आपल्या बोटीमध्ये, भागिरथी नदीतला प्लास्टिक कचरा गोळा करतात. यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, सिंगल यूज प्लास्टिक बॅग आणि प्लास्टिकचे जार यांचा समावेश असतो. हा गोळा केलेला कचरा ते दुसऱ्या दिवशी कचरापेटीमध्ये टाकून येतात.
देशाचे केंद्र सरकार सध्या प्लास्टिकविरोधी जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या नागरिकांना सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून महात्मा गांधींच्या स्वप्नातील 'स्वच्छ भारता'चे स्वप्न सत्यात उतरेल.