राहुल गांधी मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठीच अमेठीत येत आहेत - स्मृती इराणी - rahul gandhi
स्मृती इराणी यांनी ट्वीट करून प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे अशी तक्रार केली आहे की, राहुल गांधी हे मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठीच अमेठीत येत आहेत. मी आशा करते की, तुम्ही यावर कारवाई कराल. देशातील जनतेने हे ठरवायला पाहिजे की, राहुल गांधींच्या या राजकारणाला शिक्षा द्यायची की नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या लोकसभा उमेदवार स्मृती इराणींनी राहूल गांधी मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठीच अमेठीत येत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
स्मृती इराणी यांनी ट्वीट करून प्रशासन आणि निवडणूक आयोगाकडे अशी तक्रारल केली आहे की, राहुल गांधी हे मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठीच अमेठीत येत आहेत. मी आशा करते की, तुम्ही यावर कारवाई कराल. देशाची जनतेने हे ठरवायला पाहिजे राहुल गांधींचे या राजकारणाला शिक्षा द्यायची का नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.
या टप्प्यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ईव्हीएमध्ये बंद होणार आहे. यामध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राजीव प्रताप रुडी, जयंत सिन्हा या उमेदवारांचा समावेश आहे.
दरम्यान, आज अमेठी मतदारसंघातही मतदान पार पडत आहे. या ठिकाणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपकडून केंद्रीय मंत्री सृती इराणी मैदानात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्राबाहेर कडेकोट पोलीस बंदोवस्त तैनात करण्यात आला आहे.
आज एकूण ७ राज्यांमधील ५१ मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. या सात राज्यांमध्ये बिहारमध्ये ५ जागा, जम्मू-काश्मीरमध्ये २ जागा, झारखंडमध्ये ४ जागा, मध्य प्रदेशात ७ जागा, राजस्थानमध्ये १२, उत्तर प्रदेशात १४, पश्चिम बंगालमध्ये ७ जागांसाठी मतदान सुरू आहे.