महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

VIDEO : 'दोरीवरची कसरत' जीव धोक्यात घालून नदी पार करतहेत नागरिक - river

महिला दोरीवर शरीराचे संतुलन साधत नदी पार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

'दोरीवरची कसरत' जीव धोक्यात घालून नदी पार करतायेत नागरीक

By

Published : Jul 14, 2019, 9:59 PM IST

देवास - मध्यप्रदेशमधील सोनकच्छ येथील ग्रामिण भागातील गावकऱ्यांना घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. काही महिलांचा दोरीवर शरीराचे संतुलन साधत नदी पार करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.


सोनकच्छ येथील गावकऱयांना नदीवरून ये-जा करण्यासाठी पुल नाही आहे. सध्या पावसामुळे नदीला पूर आला आहे. त्यामुळे गावकरी नदीवरून ये-जा करण्यासाठी दोरीचा पुलासारखा वापर करत आहेत. आपला जीव धोक्यात घालून गावकऱयांना ही कसरत करावी लागत आहे. नदी पार करताना दोरीवर शरीराचे संतुलन न साधल्यामुळे अनेक जण नदीमध्ये पडले आहेत.


सततच्या मुसळधार पावसामुळे मध्यप्रदेश, आसाम आणि बिहार या राज्यांना पुराचा फटका बसला आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे आसाम आणि बिहारमधील अनेक भाग पुर्णतः पाण्याखाली गेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details