नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असे वक्तव्य काल ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी केले होते. त्यावर खासदार के. टी. एस तुलसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकृत मानसिकता असेलेल्या व्यक्तींना जगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. तुसली राज्यसभेचे खासदार असून ज्येष्ठ वकीलही आहेत.
भारतामध्ये दोषींना खूप कमी वेळा फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, यातून आपण समतोल साधला आहे. मागील १७ वर्षात फक्त ४ दोषींना आपण फासावर चढवले आहे. निर्भया प्रकरणात क्रूरतेचा कळस गाठण्यात आला होता. त्यामुळे अशा दोषींना फाशीची शिक्षा देऊन समाजासमोर आपण उदाहरण ठेवल पाहिजे, असे तुलसी यांनी सांगितले.