महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला जाणार' - पत्रकार परिषद

उद्या शनिवारी राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.

cm uddhav thackeray ayodhya visit
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौरा

By

Published : Mar 6, 2020, 3:06 PM IST

अयोध्या - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाणार आहे. ठाकरे सरकारला शनिवारी 100 दिवस पूर्ण होत आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि काही नेते मंडळीही असतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा...महा'अर्थ' संकल्प : 'महाराष्ट्र शिकावू उमेदवार प्रोत्साहन योजने'तून देणार बेरोजगारांच्या हाताला काम

शिवसेनेचा मुख्यमंत्री हा रामलल्लाचा आशीर्वाद...

उद्धव ठाकरे यांचे अयोध्येतील आगमन महत्त्वाचे आहे. रामलल्लाच्या कृपेने महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे. हा आम्हाला मिळालेला प्रसाद आहे, असे आम्ही मानतो. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे हे प्रथम लखनौला येतील, त्यानंतर ते अयोध्येला जातील, असे राऊत यावेळी म्हणाले.

काँग्रेस नेत्यांनाही अयोध्येला येण्याचे केले आव्हान...

देशातील सर्वांनी रामाचे दर्शन घ्यावे. अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले. 'उद्धव ठाकरेंचा कार्यक्रम हा पूर्णपणे धार्मिक कार्यक्रम असेल. यात कोणतेही राजकारण करण्याची गरज नाही. सरकार सरकारच्या जागी आणि आस्था आस्थेच्या जागी आहे. काँग्रेसच्या लोकांनेही या ठिकाणी यावे. ज्या लोकांना आस्था आहे, त्या पक्षाच्या लोकांनीही या ठिकाणी यावे, असे आम्हाला वाटते, असे राऊत यावेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे हे उद्या अयोद्धेला जाणार आहेत. दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी ते श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. तर सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी ते मुंबईसाठी रवाना होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असल्याने ते तिथे थांबणार नाहीत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details