कोलकाता- पश्चिम बंगालच्या भाजप खासदार रुपा गांगुली यांच्या मुलाला पोलिसांनी अपघाताप्रकरणी ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेमध्ये असताना अपघात झाल्याचा आरोप त्यांचा मुलगा आकाश याच्यावर आहे. या प्रकरणी खासदार रुपा गांगुली यांनी निष्पक्ष चौकशी करण्याबाबत ट्विट केले आहे. ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टॅग केले आहे.
काल रात्री (गुरुवारी) आकाश याच्या गाडीला अपघात झाला होता. वळण घेत असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घराजवळील एका गोल्फ कल्बच्या भिंतीला गाडी धडकली होती. यामध्ये काही लोक थोडक्यात वाचल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. या अपघातामध्ये रुपा गांगुली यांचा मुलगा आकाश किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर भाजप खासदार रुपा गांगुली यांनी एक ट्विट केले आहे.