नवी दिल्ली -मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यातील मानवर पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या बोरलाई या गावात मुले चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी सहा शेतकऱ्यांना मारहाण केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची वाहने पेटवून दिली. या घटनेत एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मध्य प्रदेश : मुले चोरीच्या संशयावरून सहा शेतकऱ्यांना मारहाण, एकाचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यामधील बोरलाई या गावात मुले चोरीच्या संशयावरून ग्रामस्थांनी सहा शेतकऱ्यांना मारहाण केली. यामध्ये एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
संबधीत शेतकरी इंदोरमधील शिवपूरखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या गावामध्ये बोरलाई येथील 5 मजूर काम करत होते. त्या मजुरांनी कामापूर्वीच 50 हजार रुपये आगावू घेतले होते. मात्र, पैसै घेतल्यानंतर मजूर कामावर आले नाही. त्यामुळे मजुरांची भेट घेण्यासाठी शेतकरी गावात आले होते. मात्र, मजुरांनी कामावर येण्यास नाही म्हटले आणि शेतकऱ्यांवरच दगडफेक केली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांना मुले चोर समजून मारहाण केली. शेतकऱ्यांना बडवानी आणि इंदोर येथील रुग्णालयात दाखल करण्यत आले. यावेळी उपचारादरम्यान एकाचा मृत्यू झाला.
हे सर्व प्रकरण पैशाच्या व्यवहारासंदर्भात असून आम्ही व्हिडिओ फूटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. मारहाण करणाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरक्षक आदित्य प्रताप सिंह यांनी सांगितले.