नवी दिल्ली -काँग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याबरोबर २२ आमदारांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या सरकारवर संकट आले आहे. यावर ज्योतिरादित्य यांना गेल्या 18 वर्षांच्या राजकिय कारकिर्दीत काँग्रेसने काय-काय दिले, याची आठवण करुन देणारे आणि आमदारांना परत पक्षात येण्याचे आवाहन करणारे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे.
'सिंधिया यांना गेल्या 18 वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काँग्रेसने 17 वेळा खासदार, 2 वेळा केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय सरचिटणीस, उत्तर प्रदेशचे प्रभारी, कार्यसमिती सदस्य, निवडणूक अभियान प्रमुख बनवले. तसेच त्यांना ५० पेक्षा जास्त तिकीटे आणि ९ मंत्री दिले. काँग्रेसने त्यांच्यासाठी इतके करूनही ते मोदी-शाह यांच्या शरणमध्ये गेले', असे टि्वट मध्यप्रदेश काँग्रेस सरकारने केले आहे. त्याचबरोबर त्यांनी विश्वास तुटलेले एक छायाचित्र देखील शेअर केले आहे.