भोपाळ - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अनधिकृत सावकारी करून गरीबांना लुटणाऱ्यांना सज्जड दम दिला आहे. विना परवाना सावकारी करणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकार कायदा बनवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मध्यप्रदेश: विना परवाना सावकारी करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिवराज सिंह यांचा इशारा
विना परवाना सावकारी करणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकार कायदा करणार असल्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सांगितले. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारने शंभर दिवस पूर्ण केले, त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विना परवाना सावकारी करणाऱ्यांना रोखण्यासाठी सरकार कायदा बनवणार असल्याचे शिवराज सिंह म्हणाले. गरीब आणि आदिवासींना जास्त दराने कर्ज दिले जाते. अव्वाच्या सव्वा दराने गरीबांचा जीव जातोय. कर्ज देताना गरीबांकडून घेतलेले तारण आणि इतर वस्तू माघारी करा, असे त्यांनी अनधिकृत कर्ज वाटप करणाऱ्यांना कठोर शब्दात सांगितले.
राज्य सरकार गरीबांच्या कल्याणासाठी काम करण्यास कटिबद्ध आहे. समाजातील सर्व स्तरासाठी विविध योजना आधीपासूनच सुरु आहेत, असे चौहान म्हणाले. यावेळी राज्यसभा खासदार आणि भाजप नेते ज्योदिरादित्य सिंधिया देखील उपस्थित होते.