कन्नौज -उत्तर प्रदेशातील कन्नौज जिल्ह्यात जीवन देणाऱ्या आईनेच रागाच्या भरात आपल्या ८ वर्षांच्या चिमुकल्याची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आईचा हा क्रुरपणा तेथे जवळच असलेली ४ वर्षांची मुलगी बघत होती. आपल्या आईनेच भावाला गळादाबून मारले असल्याचे तिने सांगितले आहे.
जिल्ह्यातील छिबरामऊ भागात राहणाऱ्या या आईचे हे कृत्य समजताच परिसरात शांतता पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चिमुकल्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच संबंधित महिला आणि तिची सासू आपसात भांडत असताना पोलिसांनी त्यांनाही ताब्यात घेतले आहे.
यूपीमध्ये ८ माहिन्यांच्या चिमुकल्याची आईनेच केली गळा दाबून हत्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित आईवर मुलाच्या हत्येचा आरोप लावण्यात येत आहे. मात्र, संबंधित चिमुकला आजारी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक तपास केला जात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
...तर वाचला असता चिमुकल्याचा जीव
घटनेच्या एक दिवस आधीच मृत चिमुकल्याची आजी छिबरामऊ पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली होती. तीने तेथे आपल्या नातवाला त्याची आई मारू शकते, असे सांगितले होते. मात्र, पोलिसांनी तिच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आणि तिला पोलीस ठाण्यातून हाकलून दिले. एवढेच नाही तर जेव्हा, असे काही होईल तेव्हा तक्रार घेऊन ये. आम्ही तिला अटक करू असे सांगितले. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळेच संबंधित चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. वेळीच पोलिसांनी कारवाई केली असती तर या चिमुकल्याचा जीव वाचला असता.