महाराष्ट्र

maharashtra

दिल्ली हिंसाचार : माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार, फैजानच्या आईचा आरोप

आम्ही सीएएविरोधात धरणे आंदोलन करत असताना अचानक पोलीस आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हटविले. दरम्यान, झटापट झाली असता, माझा मुलगा फैजान जो घरी होता, मला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. मी त्याला शोधू लागले, यावेळी काही जखमींना रुग्णालयात भरती केल्याचे माहिती मिळाली म्हणून त्याला शोधायला मी रुग्णालयात गेले. मात्र, तो तेथेही मिळाला नाही.

By

Published : Feb 28, 2020, 11:53 AM IST

Published : Feb 28, 2020, 11:53 AM IST

ETV Bharat / bharat

दिल्ली हिंसाचार : माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीसच जबाबदार, फैजानच्या आईचा आरोप

माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार, फैजानच्या आईचा आरोप
माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार, फैजानच्या आईचा आरोप

नवी दिल्ली - येथे एनआरसी कायद्याला विरोध दर्शविताना २३ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या हिंसाचारात अनेकांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, व्हॉट्सअ‌ॅपवर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये काही पोलीस कर्मचारी ५ युवकांना क्रुरतेने मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीत फैजानचा मृत्यू झाला. यावर फैजानच्या आईने रडत-रडत आपल्या मुलासोबत घडलेल्या प्रसंगाबाबत प्रतिक्रिया देत असताना फैजानच्या मृत्यूस पोलीस कारणीभूत असल्याचे सांगत पोलिसांवर गंभीर आरोपही केले.

माझ्या मुलाच्या मृत्यूला पोलीस जबाबदार, फैजानच्या आईचा आरोप

फैजानची आई म्हणाली, आम्ही सीएएविरोधात धरणे आंदोलन करत असताना अचानक पोलीस आले आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांना हटविले. दरम्यान, झटापट झाली असता, माझा मुलगा फैजान जो घरी होता, मला शोधण्यासाठी घराबाहेर पडला. मात्र, त्यानंतर तो पुन्हा घरी परतलाच नाही. मी त्याला शोधू लागले, यावेळी काही जखमींना रुग्णालयात भरती केल्याचे माहिती मिळाली म्हणून त्याला शोधायला मी रुग्णालयात गेले. मात्र, तो तेथेही मिळाला नाही. यानंतर, मी ज्योती नगर पोलीस ठाण्यात जाऊन फैजानचा फोटो त्यांना दाखवला आणि त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. फैजान पोलीस ठाण्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यांनी मला त्याला भेटू दिले नाही. त्यामुळे, आपण स्थानिक नगरसेवक साजिद खान यांच्याकडे मदत मागितली. त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली मात्र तरीही, पोलिसांनी फैजानला सोडलं नाही. दुसऱ्यादिवशी त्याची प्रकृती अधिकच बिघडली होती असेही त्याच्या आईने यावेळी सांगितले.

हेही वाचा -दिल्ली हिंसाचार: 'निष्कर्ष काढण्याआधी परिस्थिती नीट समजून घ्या', आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला भारताचा सल्ला

माझ्या पतीचे निधन होऊन २० वर्ष झाली असून घरी ४ मुली आहेत. आमच्या घरात फैजान एकुलता कमावणारा व्यक्ती होता. ज्याला पोलिसांनी हिरावून घेतले असे म्हणत फैजानच्या आईने पोलिसांच्या क्रुरतेविषयी राग व्यक्त केला.

हेही वाचा -दिल्लीतील जनजीवन पूर्व पदावर, परिस्थिती नियंत्रणात

ABOUT THE AUTHOR

...view details