तिरुवनंतपुरम (कोझिकोड) -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने सर्व धार्मिक स्थळेही बंद होती. आता काही अटींसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. गर्दी टाळण्यासाठी धार्मिक स्थळे आपापल्यापरिने काळजी घेत आहेत. कुट्टीचिरा येथील मशिदीत गर्दी टाळण्यासाठी एक अनोखा पर्याय शोधण्यात आला आहे. मशिद चालवणाऱ्या समितीने लोकांना नमाज अदा करण्यासाठी स्मार्ट कार्ड देणे सुरू केले आहे.
समितीने नियमीतपणे मशिद येणाऱ्या नागरिकांना स्मार्ट कार्ड दिले आहेत. हे कार्ड असणाऱ्या लोकांनाच मशिदीमध्ये प्रवेश दिला जातो. मशिदीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने सॅनिटायझर्सनी हात धुणे सक्तीचे केले आहे. या स्मार्टकार्डधारकांना आपली ओळखही कॅमेऱ्यावर सांगावी लागत आहे.