महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पुढच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हारणार? रस्मुसेनचा सर्व्हे - usa democrets party

एका अहवालानुसार ५२ टक्के अमेरिकन मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यविरोधात कल दिल्याचे समोर येत आहे.

डोनाल्ड ट्रम्प

By

Published : Sep 6, 2019, 7:40 AM IST

वाशिंग्टन -अमेरिकचे अध्यक्ष पदाची निवडणुक २०२० साली होणार आहेत. या पार्श्वभूमीवर एक सर्व्हे घेतला गेला. या सर्व्हेचा अहवाल गुरूवारी समोर आला आहे. त्यानुसार ५२ टक्के अमेरिकन मतदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यविरोधात कल दिल्याचे समोर येत आहे.

निवडणुकीच्या कलासंबंधीचा हा सर्व्हे 'रस्मुसेन' या संस्थेने घेतला होता. यात ४२ टक्के अमेरिकन मतदार हे अजुनही ट्रम्प यांच्या बाजूने आहेत, ५२ टक्के विरोधात तर ६ टक्के मतदारांचे अजुन ठरलेले नाही.

संस्थेच्या अहवालानुसार, टॅम्प यांच्या रिपब्लीकन पक्षातही त्यांच्या विरोधात सूर असल्याचे समोर येत आहे. यात ७५ टक्के रिपब्लीकन हे ट्रम्प यांची साथ सोडायला तयार नाहीत तर, २१ टक्के रिपब्लीकन बंड पुकारण्याच्या दिशेने आहेत. तसेच संपुर्ण निवडणुकीबद्दल भाष्य करताना संस्थेने सांगितले, डोनाल्ड ट्रम्प ८२ ते १३ टक्के फरकाने त्यांच्या विरोधी पक्ष डेमोक्रेटसकडून हारतील.

ABOUT THE AUTHOR

...view details