महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्ध्यापेक्षा जास्त आयएएफ एएन-३२ विमानांमध्ये नवीन तंत्रज्ञानासह बदल केले - संरक्षण राज्यमंत्री - श्रीपाद नाईक

रशियन बनावटीचे आयएएफ एएन-३२ हे विमान १९८० साली वायुसेनेत दाखल करण्यात आले होते. यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाद्वारे बदल करण्यात येत होते. परंतु, अपघात झालेल्या विमानात नवीन बदल करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली होती.

आयएएफ एएन-३२

By

Published : Jul 15, 2019, 8:05 PM IST

नवी दिल्ली- भारतीय वायुसेनेचे आयएएफ एएन-३२ विमानाचा ३ जूनला अपघात झाला होता. अपघातामध्ये वायुसेनेचे १३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. रशियन बनावटीचे आयएएफ एएन-३२ हे विमान १९८० साली वायुसेनेत दाखल करण्यात आले होते. यात वेळोवेळी नवीन तंत्रज्ञानाद्वारे बदल करण्यात येत होते. परंतु, अपघात झालेल्या विमानात नवीन बदल करण्यात आले नसल्याची माहिती समोर आली होती.

आज (सोमवारी) राज्यसभेत आयएएफ एएन-३२ संबंधी चर्चा झाल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी माहिती देताना सांगितले, भारतीय वायुसेनेकडील अर्ध्यापेक्षा जास्त विमानांमध्ये नवीन तंत्रज्ञानानुसार बदल करण्यात आले आहेत. इतर विमानांमध्येही बदल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. रशियन बनावटीच्या या विमानाचे काही सुट्या भागांची कमतरता आहे. भारतीय वायुसेनेकडे एकूण ९८ आयएएफ एएन-३२ विमाने आहेत. यापैकी एकाचीही उड्डाणाची वयोमर्यादा संपली नाही. त्यामुळे सर्व विमाने उड्डाण घेण्यासाठी योग्य आहेत.

आसाममधील जोरहाट विमानतळावरून उड्डाण केलेले आएएफ एएन-३२ हे विमान ३ जूनला १२ वाजून २५ मिनिटांनी बेपत्ता झाले होते. या विमानात वायुसेनेचे १३ कर्मचारी होते. ११ जूनला अरुणाचल प्रदेशमधील सियांग डोंगरावर दुर्घटना झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते. मृतांमध्ये विंग कमांडर जी. एम. चार्ल्स, स्क्वाड्रन लीडर एच. विनोद, फ्लाइट लेफ्टनंट आर. थापा, फ्लाइट लेफ्टनंट ए. तंवर, फ्लाइट लेफ्टनंट एस. मोहांती, फ्लाइट लेफ्टनंट एम. के. गर्ग, वॉरंट ऑफिसर के. के. मिश्रा, सार्जंट अनुप कुमार, कॉर्पोरल शेरीन, लीड एअरक्राफ्ट मॅन एस. के. सिंह, लीड एअरक्राफ्ट मॅन पंकज, कर्मचारी पुताली आणि राजेश कुमार यांचा समावेश होता.

३ वर्षांपूर्वीही आयएएफ एएन-३२ विमान झाले होते बेपत्ता

२२ जुलै २०१६ रोजी आयएएफ एएन-३२ विमान २९ प्रवाशांना घेवून उडाले होते. चेन्नईहून पोर्ट ब्लेअरकडे (अंदमान आणि निकोबार) निघालेले हे विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाले होते. यासाठी शोधकार्य राबवण्यात आले होते. पण अजूनही या विमानाचा शोध लागला नाही. या विमानातही नवीन तंत्रज्ञानासह सुधारणा करण्यात आली नव्हती.

ABOUT THE AUTHOR

...view details