नवी दिल्ली - फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह यांनी अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी पश्चिम बंगाल येथील कलाईकुंडा विमानतळावरुन हॉक विमानाचे उड्डाण केले.
अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणारी पहिली महिला बनली मोहना सिंग
मोहना यांना ५०० तास हॉक एफके १३२ विमान उडवण्याचा अनुभव आहे. त्यांनी पश्चिम बंगाल येथील कलाईकुंडा विमानतळावरुन हॉक विमानाचे उड्डाण केले. अत्याधुनिक हॉक जेट विमान उडवणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मान मोहना सिंग यांनी मिळवला आहे.
सुरक्षा मंत्रालयाने याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की फ्लाईट लेफ्टनंट मोहना सिंह यांनी पश्चिम बंगाल येथील कलाईकुंडा विमानतळावरुन यशस्वीरित्या अत्याधुनिक हॉक विमानाचे उड्डाण केले. मोहना यांनी एका दिवसात ४ सैन्य उड्डाणे पूर्ण केली आहेत. याबरोबर, हॉक विमानाचे उड्डाण करणाऱ्या त्या पहिल्या महिला पायलट बनल्या आहेत. मोहना यांना ५०० तास हॉक एफके १३२ विमान उडवण्याचा अनुभव आहे.
मोहना सिंह जून २०१६ मध्ये भावना कंठ आणि अवनी चतुर्वेदी यांच्याबरोबर लष्करी विमानाने उड्डाण करणाऱया दलात सामिल झाल्या होत्या. मोहना यांनी हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करणाऱया लढाऊ विमानांचे प्रशिक्षण घेतले आहे. यादरम्यान त्यांनी रॉकेट, बंदुक आणि हाय कॅलिबर बॉम्बचा पाडाव केला आहे.