महाराष्ट्र

maharashtra

फक्त इंग्रजीमुळेच अधिक पैसे कमवू शकतो, हा समज बदलणे गरजेचे - मोहन भागवत

By

Published : Aug 18, 2019, 11:23 AM IST

संघ प्रमुख मोहन भागवत यांनी इंग्रजी भाषेसंदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की मातृभाषेला चालना दिली पाहिजे. याबरोबरच संघ प्रमुख आणखी काय म्हणाले घ्या जाणून.

मोहन भागवत

नवी दिल्ली- इंग्रजी ज्ञानामधूनच केवळ चांगले ज्ञान मिळवता येते, ही धारणा बदलण्याची गरज आहे. मातृभाषांना चालना देण्यावर लोकांनी भर दिला पाहिजे, असे वक्तव्य आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी केले आहे.

ते इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठात आरएसएसशी संबंधित शिक्षण संस्कृती उत्थान न्यास (एसएसयूएन) येथे आयोजित 2 दिवसीय परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना भागवत म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या इतर विषयांबरोबरच आध्यात्मिक ज्ञान देखील देण्याची गरज आहे. तसेच जर एखादी व्यक्ती रोजीरोटीसाठी शिक्षण घेत असेल, तर ते शिक्षण नाही. कारण, समाजात अशी अनेक उदाहरणे आहेत जे अशिक्षित असून त्यांनी शिक्षित लोकांना नोकरी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details