दिल्ली/रांची - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंड दौऱ्यावर आहेत. हजारीबाग येथील ३ वैद्यकीय महाविद्यालय आणि रामगढ येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयाचे ते उद्घाटन करणार आहेत. तसेच ५०० खाटांच्या एका रुग्णालयाच्या कोनशिलेचे उद्घाटनही ते करतील.
मोदी आज झारखंड दौऱ्यावर, अनेक योजनांचे करणार उद्घाटन - scheme
रांचीमध्ये तीन वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांचे उद्घाटनही मोदी करणार आहेत.
ग्रामीण पेयजल योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या एका योजनेचे उद्घाटन ते रामगड आणि हजारीबाग येथे करतील. तसेच, साहिबगंज सीवरेज ट्रीटमेंट प्लँट आणि नमामी गंगे योजनेंतर्गत मधुसुदन घाटाचे उद्घाटन करतील. तसेच, हजारीबाग शहरातील पाईप लाईन, हजारीबागमधील ४ आणि रामगडमधील २ पेयजल योजनेच्या कोनशिलेचे उद्घाटन करतील.
आदिम जनजाती समुदायासाठी (पीटीजी) २७१८ पाईप लाईन पेयजल योजनेची कोनशिला आज ठेवण्यात येणार आहे. हजारीबाग येथील आचार्य विनोबा भावे विद्यापीठामध्ये ट्राईबल स्टडीज केंद्राच्या कोनशिलेचे उद्घाटनही पंतप्रधान करतील. यासह शासकीय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी गिफ्ट मिल्क स्कीम, प्रधानमंत्री आवास योजना आदी योजनांच्या उपक्रमांचे उद्घाटन होईल. त्यानंतर पंतप्रधान आयुष्मान भारतच्या लाभार्थ्यांशी भेटतील.