दहशतवाद हा शांतता आणि सुरक्षिततेसाठी मोठी समस्या म्हणून समोर आला आहे. त्यामुळे सर्वप्रकारचा दहशतवाद आणि त्यांना मिळणारे सहकार्य समूळ नष्ट करण्यासठी संबंधित देशांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
शांतता, सुरक्षिततेला दहशतवादाचा मोठा धोका - मोदी - peace
पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तामिम बिन हमद बिन खलीफा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या वेळी मोदी यांनी आपले मत मांडले.
पंतप्रधान मोदी आणि अमीर शेख
पंतप्रधान मोदी यांनी कतारचे अमीर शेख तामिम बिन हमद बिन खलीफा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या वेळी मोदी यांनी आपले मत मांडले.
कतारचे अमीर शेख यांनी त्यांना फोन केला होता. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार,कतारसोबतचे संबंध बळकट करण्यासठी भारत प्राधान्य देतो. कतार हा भारताचा चांगला मित्र आहे. यावेळी दोन्ही नेत्यांत क्षेत्रीय समस्यांवर चर्चा झाली.