पाटना - देशातील लोकांच्या मनात किती आग आहे,हे मी समजू शकतो. जी आग तुमच्या मनात आहे,तीच माझ्याही मनात आहे,असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. ते पाटणा येथे बोलत होते. मेट्रो आणि खत कारखान्यांच्या उद्घाटनासाठी मोदी पाटण्यात आले होते. यावेळी त्यांनी पुलवामा घटनेचा उल्लेख करत वरील वक्तव्य केले.
जी आग तुमच्या मनात, तीच माझ्याही मनात - नरेंद्र मोदी - metro
बिहारमध्ये अनेक विकासकामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान बिहारला गेले होते
मोदी म्हणाले,आज हजारो कोटी रुपयांच्या योजनांचे उद्घाटन बिहारमध्ये होत आहे. यात पाटणा शहराला स्मार्ट बनविण्यासाठीचा प्रकल्प समाविष्ट आहे. औद्योगिक विकास आणि रोजगारसंबंधीत प्रकल्प आहेत. तसेच,बिहारमध्ये आरोग्या सुविधांची वृद्धी करण्यासाठीच्या योजनांचाही समावेश आहे.
बरौनी येथून मोदींनी पाटना मेट्रो प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. या प्रकल्पासाठी २ हजार कोटी खर्च येणार आहे. यातील २० टक्के खर्च राज्य सरकार तर २० टक्के खर्च केंद्र सरकार करेल. उर्वरीत ६० टक्के खर्च पाटणा मेट्रो महामंडळ करणार आहे.