नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठीचे मतदान ६ मेला होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती हे आज आयोध्या येथे सभा घेणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून आयोध्या येथे जाण्याची नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच आयोध्येत; अखिलेश, मायावतींचीही आज सभा
पंतप्रधान नरेंद्र मोदी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती हे आज आयोध्या येथे सभा घेणार आहेत. पंतप्रधान झाल्यापासून आयोध्या येथे जाण्याची नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच वेळ आहे.
मोदी यांची सभा ही दुपारी १२ वाजता माया बाजार येथे होणार आहे. माया बाजार हा परिसर हा बाबरी मशीदीपासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. या सभेत आयोध्या येथील राम मंदीराबाबत ते बोलण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि भाजप सारख्या उजव्या विचारसरणाच्या पक्ष हे नेहमी राम मंदिराचा मुद्दा उचलतात. या सभेची अशा पक्षांना मदत होण्याची शक्यता आहे.
अखिलेश आणि मायावती हे देखिल रामस्नेही घाट येथील संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत. ही सभा आज दुपारी होणार आहे. रामस्नेही घाटाचा परिसर हा फैजाबाद लोकसभा मतदारसंघात येतो.