कोलकाता - पंतप्रधान मोदींनी मिशन शक्तीविषयी मोठी घोषणा करून संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भडकल्या आहेत. 'आचारसंहितेचा भंग करत निवडणुकीच्या तोंडावरच ही घोषणा करण्याची काय गरज होती? मोदी अंतराळ संस्थेत काम करत होते की, त्यांना अंतराळात जायचे होते? एवढे करून केले काय, तर फक्त एकच तर उपग्रह पाडला; ज्याची गरजही नव्हती,' असे वक्तव्य बॅनर्जी यांनी केले आहे.
मिशन शक्तीः मोदी काय अंतराळात जाणार होते? 'ईसी'कडे तक्रार करणार - ममता बॅनर्जी - pm modi
'ही घोषणा म्हणजे प्रचार जाहिरातबाजी होती. या प्रकल्पाचे श्रेय मोदींना घेण्याची काहीही गरज नव्हती,' असे त्या म्हणाल्या. 'हा आचार संहितेचा भंग आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल,' असे बॅनर्जी यांनी सांगितले.
'ही घोषणा म्हणजे प्रचार जाहिरातबाजी होती. या प्रकल्पाचे श्रेय मोदींना घेण्याची काहीही गरज नव्हती,' असे त्या म्हणाल्या. 'मोहीम केव्हा घडवून आणायची, त्याविषयी घोषणा करायची हा शास्त्रज्ञांचा अधिकार आहे. या मोहीमेचे मोदींनी श्रेय घेण्याचा प्रयत्न करणे, त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणे, त्याआडून प्रचार करणे हा आचार संहितेचा भंग आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाईल,' असे बॅनर्जी यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदींनी भारताच्या 'अँटी सॅटेलाईट' क्षेपणास्त्राने 'सॅटेलाईट'चा यशस्वीरीत्या वेध घेतल्याची माहिती दिली होती. या क्षेपणास्त्राच्या चाचणीत लो-अर्थ ऑरबिटमधील एक सॅटेलाईट यात उद्ध्वस्त करण्यात आला होता. यामुळे भारत यापूर्वी अशी कामगिरी करणाऱ्या अमेरिका, रशिया, चीन यांच्या पंक्तीत चौथ्या क्रमांकावर जाऊन बसला.