महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रीय महामार्ग बांधणीत महाराष्ट्र अव्वल; वर्षभरात 2,293 किलोमीटरचे रस्ते तयार - महाराष्ट्र रस्ते बांधणी

महाराष्ट्रात 2018-19 या वर्षात 2,293 किलो मीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. 2018 ते 19 दरम्यान देशभरात 10,855 किमी चे रस्ते बांधण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.

2018-19 या वर्षात 2,293 किलो मीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले आहेत.

By

Published : Sep 10, 2019, 9:45 PM IST

नवी दिल्ली - महाराष्ट्रात 2018-19 या वर्षात 2,293 किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. 2018 ते 19 दरम्यान देशभरात 10,855 किमी चे रस्ते बांधण्यात आले असून, यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. याखालोखाल उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. उत्तर प्रदेशात 2018-19 मध्ये 882 कि.मी. लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांचे काम पूर्ण झाले आहे.

अधिकृत आकडेवारी
नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात अधिकृत आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, मागील वर्षी(2017-18) देशभरात 9,829 हजार किमी. चे रस्ते बांधण्यात आले होते. या वर्षी हा वेग वाढला असून, यामध्ये 1026 कि.मी.ने वाढ झाली आहे.

हेही वाचा या प्रकल्पाकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक महाराष्ट्राला देणार २० कोटी डॉलरचे कर्ज

संबंधित आकडेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुजरात राज्य 14 व्या स्थानी आहे. या वर्षभरात गुजरातमध्ये 303 किमी लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधल्याची माहिती नितीन गडकरींच्या मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. तसेच सर्वात कमी, म्हणजेच 11 कि.मी.चे महामार्ग गोवा राज्यात बांधण्यात आले आहेत. उत्तरप्रदेश नंतर मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांचा क्रमांक आहे. या राज्यांमध्ये अनुक्रमे 829 व 779 किमी लांबीचे रस्ते केंद्र सरकारने बांधले आहेत. या आकडेवारीनुसार ईशान्येकडील राज्यांमध्ये रस्ते बांधणीचे हे प्रमाण सर्वात कमी असल्याचे निदर्शनास येते.

हेही वाचा मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद; गणेशोत्सवासाठी वाहतूक पोलिसांचा निर्णय

दरम्यान, महाराष्ट्र शासनाने या वर्षीच्या अंतरिम अर्थ संकल्पात राज्यातील ग्रामीण विकास मंत्रालयाच्या 24,039 कोटी विकासनिधी पैकी 3,387 कोटी रुपये कपात करण्याचा निर्णय घेतला होता. संबंधित रक्कमेची ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे सुधारण्यासाठी तरतुद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे देण्यात आलेली आकडेवारी महत्त्वाची ठरते.

ABOUT THE AUTHOR

...view details