नवी दिल्ली - अयोध्या विवादीत जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज(शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर देशामध्ये कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे. वृत्तांकन करताना कार्यक्रमाच्या नियमावलींचे (प्रोग्राम कोड ) उल्लंघन होऊ नये, म्हणून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
AyodhyaVerdict: अयोध्या निकालावरून माहिती प्रसारण मंत्रालयाने जारी केली नियमावली - pm modi
अयोध्या विवादीत जमिनीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (शनिवारी) ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर देशामध्ये कायदा सुव्यवस्था रहावी म्हणून माहिती प्रसारण मंत्रालयाने सर्व वाहिन्यांसाठी नियमावली जाहीर केली आहे.
बैठक
सर्व वाहिन्यांनी चर्चा आणि वादविवाद कार्यक्रमांमध्ये नियमावलींचे पालन करावे, असे आवाहन मंत्रालयाकडून करण्यात आले आहे. अयोध्या निकालाच्या बातम्या देताना वाहिन्यांनी खबरदारी बाळगावी, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
सोशल मीडियावरही पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. कोणीही भडकाऊ वक्तव्य करु नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले.