महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

विमान तिकिटीचे दर कमी करण्याचा नागरी उड्डान मंत्रालयाचा विमान कंपन्यांना सल्ला - दहशतवादी

नागरी उड्डान मंत्रालयाने विमान कंपन्यांना अमरनाथ यात्रेवरून परत आलेल्या यात्रेकरूसाठी वाढते विमान भाडे नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

हरदीप सिंह पुरी

By

Published : Aug 3, 2019, 9:21 PM IST

नवी दिल्ली - श्रीनगर-दिल्ली विमान तिकिटीचे दर वाढल्याची दखल नागरी उड्डान मंत्रालयाने घेतली आहे. नागरी उड्डान मंत्रालयाने विमान कंपन्यांना अमरनाथ यात्रेवरून परत आलेल्या यात्रेकरूसाठी वाढते विमान भाडे नियंत्रित करण्याचा सल्ला दिला आहे.


जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी तिकीटाच्या वाढलेल्या दरांवर चिंता व्यक्त केली आहे. काश्मीर सोडायचे असल्यामुळे लोकांना इतके महाग तिकीट काढावे लागत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. याचबरोबर अब्दुला यांनी टि्वट्च्या माध्यमातून नागरी उड्डान मंत्री हरदीप सिंह पुरी यांना याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.


श्रीनगर-दिल्ली विमान तिकिटीचे दर हे ३ हजार ते ५ हजार रुपयापर्यंत असतात. मात्र, विस्तार एअरलाईन्सने शनिवारी रात्रीपासून ३७ हजार ९९५ रुपये तिकिटाचा दर ठेवला आहे. स्पॉट बुकिंगच्या तिकिटांचे दर शुक्रवारपासून वाढले आहेत.


अमरनाथ यात्रा मार्गावर घातपात होण्याची शक्यता असल्याने अमरनाथ यात्राही रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर पर्यटकांनाही राज्य सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यात सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान राज्यात अतिरिक्त सैन्य तैनात केल्यामुळे नारिकांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण पसरले आहे. दहशतवादी हल्ला घडण्याची शक्यता असल्याने नागरिक भेदरलेले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details