महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

हाथरस प्रकरण : मंत्री रामदास आठवले यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले बातमी

रामदास आठवले यांनी आज हाथरस येथ जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस झाली असून, लवकरच यातील सत्य समोर येईल, असे आठवले म्हणाले.

minister Ramdas Athawale
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

By

Published : Oct 6, 2020, 6:34 PM IST

हाथरस(उत्तर प्रदेश) - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज हाथरस प्रकरणातील पीडित कुटुंबाची भेट घेतली. घडलेली घटना दुर्देवी असून, याप्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे. तसेच पीडित मुलीच्या भावाला सरकारी नोकरीची मागणी यावेळी रामदास आठवले यांनी केली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

हेही वाचा -धक्कादायक..! महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक असुरक्षित

दरम्यान, रामदास आठवले यांनी आज हाथरस येथ जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस झाली असून, लवकरच यातील सत्य समोर येईल, असे आठवले म्हणाले. तसेच आरपीआयकडून पीडित कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा यावेळी मंत्री रामदास आठवले यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details