हैदराबाद - काश्मीरमधील युवकांना कट्टर बनवण्यात येत आहे, त्यांचे कट्टरतावादी विचार बदलण्याची गरज असल्याचं वक्तव्य सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी काल(गुरुवारी) दिल्लीत केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी टीका केली आहे.
झुंडशाहीने बळी घेणाऱ्यांना आणि दलितांना मारणाऱ्यांना कट्टरतावादापासून कोण दूर करेल, असा सवाल त्यांनी केला आहे. मेरठ येथील पोलीस अधिक्षक सीएए आंदोलनावेळी मुस्लिम गल्लीमधील नागरिकांना पाकिस्तानात जायला सांगतात, जे लोक मॉबलिंचीगच्या नावाखाली मुस्लिम आणि दलितांना मारत आहेत, त्यांचे कट्टर विचार कोण बदलेल ? असा प्रश्न ओवैसी यांनी रावत यांना विचारला.
झुंडशाहीने दलित आणि मुस्लिमांचा बळी घेणाऱ्यांचे कट्टर विचार कोण बदलणार? - सीडीएस बीपीन रावत काश्मीर युवक
दलितांना कपडे काढून मारले जाते, त्यातील एका पीडित तरुणांने राष्ट्रपतींना पत्र लिहले की, मला अशा देशात पाठवा, जेथे माझ्यावर अशा प्रकारचे अत्याचार होणार नाहीत - ओवैसी
दलितांना कपडे काढून मारले जाते, त्यातील एका पीडित तरुणांने राष्ट्रपतींना पत्र लिहले की, मला अशा देशात पाठवा, जेथे माझ्यावर असे अत्याचार होणार नाहीत. अशा झुंडशाही विचारांना कोण थांबवेल. अखलाक, राजस्थानातील फिलू खान आणि झारखंडमधील तबरेजला मारणाऱ्यांचे कट्टरतावादी विचार कोण बदलणार? अशा लोकांना डिरॅडिकलाईज कोण करणार, असा सवाल त्यांनी सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांना विचारला.
आसाममध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कार्यक्रमात ५ लाख बंगाली हिंदू आणि ५ लाख मुस्लिमांचे नावे आली नाहीत, त्यातील ५ लाख हिंदुंना नागरिकत्व देण्यासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणण्यात आला, तर ५ लाख मुस्लिमांना नागरिकत्व दिली जाणार नाही, यामुळे कट्टरतावाद वाढणार नाही का? असे औवेसी म्हणाले.