चंदीगड- पंजाबमधील पठाणकोट येथील सैन्य रुग्णालयातील डॉक्टरही कोरोनासोबत लढण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. अशात नुकतच त्यांनी एका नवजात बालकावर तातडीने शस्त्रक्रिया करुन या बालकाला जीवदान दिले आहे. सैन्याने शनिवारी याबद्दलची माहिती दिली.
सैनिकाच्या एका दिवसाच्या बाळाला आतड्यांमधील एक दुर्मिळ जन्मजात आजार असल्याचा संशय होता. ज्यामुळे, आतड्यांमध्ये ब्लॉक तयार होऊन मलमार्गाच्या सहाय्याने ओटीपोटात मलविसर्जन होऊन सेप्टिक झाले होते. या आजाराचे तातडीने निदान झाले होते. मात्र, बाळाची प्रकृती चिंताजनक होती त्यामुळे, त्याला चंदिगडजवळील चांदीमंदिर येथील सशस्त्र दलाच्या बालरोग शस्त्रक्रिया केंद्रात घेऊन जाणे शक्य नव्हते. कारण हे अंतर सहा तासांचे होते. तर, दुसरीकडे लॉकडाऊनमुळे पठाणकोटच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये बालरोग सर्जन उपलब्ध नव्हते.