महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणतात, 'मोदी है तो मुमकिन है' - ऑस्ट्रेलिया

भारत दौऱ्यावर येण्याच्या आधी 'इंडिया आयडियाज ऑफ अमेरिका-इंडिया बिझनेस कॉउंसिल'मध्ये केलेल्या भाषणात त्यांनी म्हटले, की भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार आणि ट्रम्प प्रशासनाकडे अद्वितीय अशी संधी आहे.

नरेंद्र मोदी आणि माईक पॉम्पियो

By

Published : Jun 13, 2019, 1:51 PM IST

नवी दिल्ली - अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पियो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रशंसा केली आहे. लोकसभा निवडणूक प्रचारातील लोकप्रिय म्हणीचा उल्लेख करताना, 'मोदी है तो मुमकीन है', असे त्यांनी म्हटले आहे. पॉम्पियो २४ ते ३० जून या कालावधीत भारत दौऱ्यावर येणार आहेत.

माईक पॉम्पियो यांचे ट्वीट

भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी 'इंडिया आयडियाज ऑफ अमेरिका-इंडिया बिझनेस कॉउंसिल'मध्ये केलेल्या भाषणात ते म्हटले, की भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी मोदी सरकार आणि ट्रम्प प्रशासनाकडे अद्वितीय, अशी संधी आहे. प्रचारात मोदींनी वापरलेल्या वाक्याचा आधार घेत मला जाणून घ्यायचे आहे, की भारत-अमेरिकेदरम्यान काय होऊ शकते. दोन्ही देशांकडे स्वत:च्या जनतेसाठी, हिंदी महासागर आणि जगाच्या भल्यासाठी एकसाथ पुढे जाण्याची चांगली संधी आहे. राष्ट्रपती ट्रम्पच्या नेतृत्वात अमेरिकन सुरक्षेसाठी कडक पाऊले उचलली आहेत. दहशतवाद्यांविरोधात पाकिस्तानच्या अस्वीकार्य सहयोगामुळे त्यांच्याविरोधात कडक धोरण अवलंबवले आहे.

माईक पॉम्पियो यांचे ट्वीट

आम्ही गेल्या वर्षी संरक्षण मंत्रालयासोबत २ प्लस २ चर्चा सुरू केली होती. आम्ही हिंदी महासागरातील समविचारी लोकशाही देशांसोबत (भारत, जपान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया) यांच्यात चतुर्भुज संवाद (क्वाड डायलॉग) चालू केला आहे. यामध्ये नव्याने प्रयत्न चालू आहेत. हे सर्व पाऊले चांगली ठरत आहेत. ट्रम्प प्रशासनाने सशस्त्र युएवी आणि बॅलेस्टीक मिसाईल रक्षा प्रणाली सारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तू भारताला निर्यात करण्यासाठी अमेरिकेच्या कंपन्यांना सक्षम बनवले आहे. ही मोठी उपलब्धता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details