अफगाण शरणार्थींना मिळणार भारतीय नागरिकत्व, मोदी सरकारचे मानले आभार - MIGRANTS HAPPY WITH CAA
अफगाणिस्तानातून आलेल्या शरणार्थींनी नागरिकत्व मिळाल्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. तर दुसरीकडे अफगाणिस्तानातून आलेल्या शरणार्थिनी नागरिकत्व मिळाल्यामुळे केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाल्यामुळे अफगाणिस्तानातून आलेल्या शीख कुटुंबाना दिलासा मिळाला आहे. त्यांनी या कायद्यामुळे आपल्या भारतीय नागरिकत्व मिळणार असल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.
90 च्या दशकापासून भारतात निर्वासित म्हणून वास्तव्य करत आहोत. पण आता आम्ही कायद्याने भारताचे नागरिक झालो आहोत. अफगाणिस्तानात चांगला व्यवसाय होता. मात्र, 90 च्या दशकात तालिबानच्या उदयानंतर अफगाणिस्तान सोडावे लागले आणि आम्ही पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचलो, असे शरणार्थींनी सांगितले.
सयुंक्त राष्ट्राने या शरणार्थींना आंतरराष्ट्रीय शरणार्थी म्हणून मान्यता दिली आहे. मात्र, काही काळानंतर निर्वासितांसाठी असलेली आर्थिक मदत रोखली गेली होती. सीएए मंजूर झाल्यामुळे या शरणार्थींना आता भारतीय नागरिकत्व अधिकृतपणे मिळणार आहे. या कायद्याला विरोध करू नका, असे आवाहनही त्यांनी आंदोलकांना केले आहे.