डेहराडून - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन केल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरीत कामगारांनी जीवघेणा प्रवास सुरू केला. उपासमारीने त्रस्त झालेले अनेक कामगार आपल्या गावी पायी चालत गेले आहेत.
उत्तराखंड : लॉकडाऊनमुळे स्थलांतरितांनी धरली घरची वाट... कोरोनाचा प्रसार झाल्याने अनेक उद्योग बंद झाले आहेत. त्याचा फटका कामगारांना बसला आहे. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही, काम नाही त्यामुळे पैसा मिळणार नाही हे अटळ दिसत असल्याने देशभरात स्थलांतरितांनी घरची वाट धरली. शहरामधून गावी परतलेल्या कामगारांवर राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन नजर ठेऊन असून सर्वांची तपासणी करण्यात आहे.
चामोलीतील जिल्हा प्रशासनाने गावी परत आलेल्यांना निरक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तसेच जेवणाशिवाय कोणीही झोपू नये या उद्देशाने शहरातील काही संघटना लोकांना खाद्य पॅकेटचे वाटप करीत आहे.
उत्तराखंडमध्ये 10 जण कोरोनाबाधित आहे. तर विदेशामधून परतलेल्यांना होम आयसोलेशनमध्ये ठेवले आहेत. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे थरालीचे उपजिल्हाधिकारी किशनसिंग नेगी म्हणाले. देशात सध्या कोरोनाचे एकूण २,३०१ रुग्ण आहेत. यांपैकी २,०८८ रुग्ण हे अॅक्टिव आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.