महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

भारत-चीन संघर्ष: राजधानीमध्ये हालचालींना वेग; संरक्षण मंत्र्यांची तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक - india china conflict

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने तिन्ही दलाच्या प्रमुखांसह चिफ ऑफ डिफेन्स यांच्यासोबत बैठक सुरू केली आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतही संरक्षण मंत्र्यांचे बोलणे सुरू आहे.

rajnath singh
राजनाथ सिंह

By

Published : Jun 17, 2020, 12:23 PM IST

Updated : Jun 18, 2020, 7:28 AM IST

नवी दिल्ली - भारत आणि चीन संघर्षानंतर दोन्ही बाजूने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तातडीने तिन्ही दलाच्या प्रमुखांसहित चिफ ऑफ डिफेन्स यांच्यासोबत बैठक सुरू केली आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासोबतही संरक्षण मंत्र्यांचे बोलणे सुरू आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये झटापट झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीप्रकरणी प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले आहे. त्यांनी ट्वीट करत पंतप्रधान मोदी गप्प का..? लपत का आहात..? असे प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधी पक्षांनी आवाज उठवल्यामुळेही केंद्र सरकारकडून हालचालींना वेग आल्याचे बोलले जात आहे.

काय घडलं भारत-चीन सीमेवर -

सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अ‌ॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.

Last Updated : Jun 18, 2020, 7:28 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details