महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

कर्तारपूर कॉरिडॉवरील पुलासंदर्भात भारत-पाकिस्तानात महत्त्वाची बैठक - kartarpur corridor

पाकिस्तानच्या चार आणि भारताच्या दोन अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जतिंदर सिंह यांनी सांगितले. भारताने १०० मीटरचा पूल बांधला असून चीननेही पुलाचा काही भाग बांधला असून हा पूल एकमेकांना जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

kartarpur corridor
कर्तारपूर कॉरिडॉर बातमी

By

Published : Aug 27, 2020, 9:41 PM IST

गुरुदासपूर - भारत- पाकिस्तान देशांना जोडणाऱ्या कर्तारपूर कॉरिडॉरसंबंधी एक बैठक आज(गुरुवार) पार पडली. या मार्गावर एक पूल (फ्लायओव्हर) बांधण्यात येत असून दोन्ही देशांकडून हा पूल बांधण्यात येत आहे. दोन्ही देशांमधील झीरो लाईन या ठिकाणी ही बैठक झाली.

पाकिस्तानच्या चार आणि भारताच्या दोन अधिकाऱ्यांनी बैठकीत भाग घेतल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी जतिंदर सिंह यांनी सांगितले. भारताने १०० मीटरचा पूल बांधला असून चीननेही पुलाचा काही भाग बांधला असून हा पूल एकमेकांना जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही बैठक सुमारे एक तास चालली. यामध्ये फक्त पुलासंबंधी चर्चा करण्यात आली. रावी नदीचा जोराचा प्रसार लक्षात घेता, मार्गावर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार काम सुरू आहे.

शिख धर्मियांचे पवित्र स्थळ गुरुनानक देव हे पाकिस्तानमध्ये आहे. हे पवित्र स्थळ भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानाक या पवित्र स्थळाला एका कॉरिडॉरद्वारे जोडण्यात आले आहे. यामुळे भारतातील शीख बांधवांना विना व्हीजा गुरुनानाक देव यांचे दर्शन घेण्याकरीता पाकिस्तानात जाता येते. साडेचार किलोमीटरचा हा कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात या कॉरिडॉरचे उद्धाटन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details