नवी दिल्ली - लडाखमधील कारगिल येथे रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलमध्ये त्याची तीव्रता 4.7 होती. भूकंपाचे केंद्र 433 किलोमीटर दूर कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस होते. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानुसार, पहाटे 3:37 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.
कारगिलला पुन्हा भूकंपाचे धक्के, तीव्रता 4.7 रिश्टर स्केल - भूकंपाचे धक्के
लडाखमधील कारगिल येथे रविवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलमध्ये त्याची तीव्रता 4.7 होती. भूकंपाचे केंद्र 433 किलोमीटर दूर कारगिलच्या उत्तर-पश्चिमेस होते.
यापूर्वी गुरुवारी लडाखमध्ये सुद्धा भूकंपाचे झटके जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.5 इतकी नोंदवण्यात आली होती. भूकंपाचा केंद्रबिंदू 119 किलोमीटर दूर कारगिलच्या उत्तर-पश्चिम भागात होता. हा भूकंप दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी जाणवला होता. लडाखमध्ये गेल्या एखा आठवड्यात दुसऱ्यांदा भूकंपाचे झटके जाणवले आहेत. यापूर्वी 27 जून रोजी 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले होते.
गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील आसपासच्या परिसरात भूकंपाचे झटके वारंवार जाणवत आहेत. सुदैवाने या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने कोणतीही जिवितहानी झाली नाही.