महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

निर्दोष नागरिकांची हत्या थांबवा... मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पत्र - मानवतावादी

परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना सणसणीत पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रात पाकिस्तानी सैनिकांकडून निर्दोष नागरिकांची केल्या जाणाऱ्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.

पाक-भारत

By

Published : Jul 31, 2019, 9:27 PM IST

नवी दिल्ली -पाकिस्तानी सैन्यांकडून मंगळवारी करण्यात आलेल्या गोळीबारात अनेक सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यावर आज बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना सणसणीत पत्र पाठवण्यात आले आहे. पत्रात पाकिस्तानी सैनिकांकडून निर्दोष नागरिकांची केल्या जाणाऱ्या हत्येचा निषेध नोंदवला आहे.


पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आलेल्या गोळीबारात अनेक सामान्य नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. यावर परराष्ट्र मंत्रालयाकडून पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना पत्र पाठवण्यात आले आहे.


'निर्दोष नागरिकांची हत्या थांबवावी. ह्या हत्या मानवतावादी आणि लष्कराच्या आचरणांविरूध्द आहेत. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी निर्दोष नागरिकांच्या हत्येच्या कृत्याचा तपास करावा', असे पत्रात म्हटले आहे.


मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत नौशेरा सेक्टरमध्ये रात्री १२. ३० च्या सुमारास गोळीबार केला. याबरोबरच तंगधार क्षेत्रामध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. या गोळीबारामध्ये सीमेजवळ राहणारे ४ नागरीक जखमी झाले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details