नवी दिल्ली - लोकसभा निवडणूक २०१९ चे वारे वेगाने वाहत असताना आणखी एका भाजप उमेदवाराची जीभ घसरली आहे. भाजप उमेदवार बृजभूषण शरण सिंह यांनी बसप अध्यक्ष मायावती यांना थेट 'गुंडी' असे संबोधत वादाला तोंड फोडले आहे. बृजभूषण यांनी 'मायावती यूपीची गुंडी' असून त्यांना निवडणुकीनंतर तुरुंगात जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, असे म्हटले आहे.
मायावती यूपीची 'गुंडी', भाजप उमेदवार बृजभूषण यांची जीभ घसरली
'मायावतींनी मला एका सभेमध्ये 'गुंड' आणि 'दहशतवादी' म्हटले होते. मात्र, यूपीची गुंडी मायावती आहे. त्यांनी मला निवडणुकीनंतर तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीनंतर त्याच तुरुंगात जातील,' असे बृजभूषण सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.
'मायावतींनी मला एका सभेमध्ये 'गुंड' आणि 'दहशतवादी' म्हटले होते. मात्र, यूपीची गुंडी मायावती आहे. त्यांनी मला निवडणुकीनंतर तुरुंगात टाकण्याची भाषा केली होती. मात्र, प्रत्यक्षात निवडणुकीनंतर त्याच तुरुंगात जातील,' असे बृजभूषण सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे. ते उत्तर प्रदेशच्या कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आहेत.
मायावती यांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यास भाजप उमेदवार बृजभूषण जबाबदार असल्याचे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी यूपीतील गोंडा येथे एका सभेत त्यांनी हे वक्तव्य केले होते. तेव्हा मायावती यांनी भाजप उमेदवार गुंड आणि दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मायावती यांच्या या वक्तव्यावर बृजभूषण सिंह यांनी पलटवार केला आहे.