लखनौ -समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पक्षाच्या लोकांकडून लक्षपूर्वक कसे ऐकावे, हे शिकायला हवे, असा सल्ला बसप प्रमुख मायावती यांनी दिला. फिरोजाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करताना सपा कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्यानंतर मायावतींना कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
सप कार्यकर्त्यांनी बसपच्या लोकांकडून शिस्त शिकावी - मायावती - Akhilesh Yadav
फिरोजाबादमध्ये एका रॅलीला संबोधित करताना सपा कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात घोषणा दिल्यानंतर मायावतींना कार्यकर्त्यांना सल्ला दिला.
तुम्ही (सप) कार्यकर्ते भाषण सुरू असताना मोठ्याने ओरडता आणि घोषणा देता. मला वाटते तुम्ही शांततापूर्वक कसे ऐकायचे हे बसपच्या लोकांकडून शिकायला हवे, असे मायावती म्हणाल्या. सपच्या लोकांनी अनेक गोष्टी शिकणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. सप-बसपच्या संयुक्त रॅलीमध्ये बोलताना मायावतींनी हे वक्तव्य केले. यावेळी व्यासपीठावर सप प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित होते.
मायावतींनी यावेळी भाजप आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. मतदारांनी काळजीपूर्वक राहायला हवे. कुठल्याही अमिषाला बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या राजकीय पक्ष माध्यमे, सर्व्हे आणि ओपिनियन पोल्सच्या माध्यमातून लोकांना भूलवतात. यामुळे लोकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या.