लखनौ - जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाईंड मसूद अजहरच्या नावावर भाजप मतं मिळवण्याच्या प्रयत्नात आहे, असा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर निशाणा साधला. दहशतवादाच्या मुद्यावरुन त्यांनी सरकारवर ताशेरेही ओढले.
दहशतवादी मसूदच्या नावावर भाजपचा मते मिळवण्याचा बेत - मायावती
भाजपने मसूद अजहरला पाहुणा म्हणून देशात आणले. त्यानंतर त्याला सोडून दिले. आता त्याच्या नावावर ते मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे, असे मायावतींनी मुलाखतीत म्हटले.
भाजपने मसूद अजहरला पाहुणा म्हणून देशात आणले. त्यानंतर त्याला सोडून दिले. आता त्याच्या नावावर ते मतदान मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे, असे मायावतींनी मुलाखतीत म्हटले आहे. बुधवारी मसूद अजहरला जागतीक दहशतवादी ठरवल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप काय पलटवार करणार यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात बसप, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोक दलाने आघाडी केली आहे. दरम्यान सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उचलले आहेत. पंतप्रधान मोदी यांची सरकार देशात सुरक्षा देण्यामध्ये अपयशी ठरले आहेत. दररोज आपल्या देशातील एक सैनिक मारला जात आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा देशातील सर्वात महत्वाचा मुद्दा असल्याचेही त्या म्हणाल्या.