कोलकाता - पश्चिम बंगालच्या सॉल्ट लेकमधील सर्वात लोकप्रिय दुर्गापूजा मंडळांपैकी एक असलेल्या पूजा मंडपाला बुधवारी सकाळी मोठी आग लागली. वृत्तानुसार, सॉल्ट लेकमधील एफडी ब्लॉक येथे सकाळी सव्वासहाच्या सुमारास ही आग लागली. सुदैवाने, आगीत कोणीही जखमी झालेले नाही.
हेही वाचा -'मेहबुबा मुफ्ती आणि फारूख अब्दुल्लांना भारतात राहण्याचा अधिकार नाही'
संपूर्ण मंडप या आगीच्या तडाख्यात आला होता आणि आगीने भीषण रूप धारण केले. यानंतर अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. शहराच्या उत्तर भागात ही घटना घडली.