चैन्नई - तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांची लोकप्रियता नेहमीच चर्चेचा विषय असते. अम्मांसाठी त्यांचे समर्थक काहीही करण्यास तयार असतात. दक्षिण जिल्हा एमजीआर फोरमचे माजी सचिव बवानी शंकर यांच्या मुलाचे लग्न दिवंगत जयललिता यांच्या स्मारकामध्ये पार पडले आहे.
दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मारकात पार पडला चक्क विवाह सोहळा - दिवंगत मुख्यमंत्री
दक्षिण जिल्हा एमजीआर फोरमचे माजी सचिव बवानी शंकर यांच्या मुलाचे लग्न दिवंगत जयललिता यांच्या स्मारकामध्ये पार पडले आहे.
दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या स्मारकात पार पडला चक्क विवाह सोहळा
जयललिता तब्बल तीन दशकं तमिळनाडूच्या आणि देशाच्या राजकारणात एक महत्त्वाच्या नेत्या म्हणून वावरल्या होत्या. ५ डिसेंबर 2016 जयललिता यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या स्मारकावर हे पहिले लग्न झाले आहे. हा लग्न सोहळा हिंदू पद्धतीने पार पडला. यावेळी संघटना सचिव,नगरसेवक आणि इतर नेते उपस्थित होते. यावेळी जोडप्याला उपस्थितांनी आशिर्वाद दिले.