गुवाहाटी(आसाम)-आसाम राज्यातील पूर परिस्थितीमध्ये गेल्या दहा दिवसांपासून सुधारणा होत आहे. राज्यात सध्या नऊ लाख लोक पूरग्रस्त आहेत. ही संख्या 24 जुलै रोजी 28 लाख इतकी होती. 24 जुलै नंतर पाऊस कमी झाल्यामुळे पूर परिस्थितीमध्ये सुधारणा होत असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आसाम आणि ईशान्येकडील राज्यांना दिलासा मिळाला आहे
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी राज्यात सध्या 1087 गावांमधील नऊ लाख लोक पूरबाधित असल्याचे जाहीर केले. 24 जुलै रोजी राज्यातील तब्बल 28 लाख लोकांना पुराचा फटका बसला होता. 2 हजार 543 गाव यांचा यामध्ये समावेश होता, ही गावे 26 जिल्ह्यांमधील होती.
51 हजार 770 हेक्टर जमिनीवरील पिके सध्या पाण्याखाली आहेत. 24 जुलैला 1 लाख 22 हजार 573 हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली होती.
राज्यातील एकूण 33 जिल्ह्यात पैकी 19 जिल्ह्यातील 9 लाख लोक सध्या पूरबाधित आहेत. पश्चिमेकडील 6 जिल्ह्यातील सहा लाख 26 हजार लोकांचा यात समावेश आहे. यामध्ये गोलपारा 3 लाख 3 हजार 937, मोरीगाव 1 लाख 7 हजार 578,भोंगईगाव 63 हजार 194, बारपेटा 41 हजार 716, गोलाघाट 26 हजार 184, धुबरी 27 हजार 930 आणि लखममीपुर येथील 55 हजार 691 नागरिकांचा समावेश आहे