महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

रांची : बुंडू शहरात पोस्टरबाजी करत माओवाद्यांची व्यापाऱ्यांना धमकी - झारखंड डीजीपी एमवी राव

रांचीच्या बुंडू शहरात पोस्टरबाजी करत माओवाद्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. याद्वारे भांडवलदार, कॉर्पोरेट आणि दलालांना धमकी दिली आहे. दरम्यान, बुंडू पोलिसांनी सकाळी लवकरच ही पोस्टर्स जप्त केली. तरीही, ही बाब संपूर्ण शहरात पसरली. या संदर्भात पोलिसांकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.

रांची माओवाद्यांची दहशत न्यूज
रांची माओवाद्यांची दहशत न्यूज

By

Published : Nov 21, 2020, 4:48 PM IST

रांची (झारखंड) -रांचीच्या बुंडू शहरात पोस्टरबाजी करत माओवाद्यांनी पुन्हा पोलिसांना आव्हान दिले आहे. येथे माओवाद्यांनी पोस्टर्स लावले आहेत. याद्वारे भांडवलदार, कॉर्पोरेट आणि दलालांना धमकी दिली आहे. दरम्यान, बुंडू पोलिसांनी सकाळी लवकरच ही पोस्टर्स जप्त केली. तरीही, ही बाब संपूर्ण शहरात पसरली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

रांचीत माओवाद्यांची दहशत

हेही वाचा -पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन; महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

या संदर्भात पोलिसांकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. परंतु, ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीनुसार, बुंडूच्या सभोवतालच्या भागात छापेमारी कारवाई सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मागील काही दिवसांत, खूंटी शहरातील डीसी कार्यालयाच्या आसपासच्या भागातही पोस्टर्स लावले गेले होते. यामुळे पोलिसांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला.

झारखंडचे पोलीस महासंचालक एम. व्ही. राव यांनी नुकताच कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेताना प्रत्येक स्तरावर पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली होती. असे असूनही शहरातील नक्षलवादी पोस्टर्समुळे पोलिसांच्या सक्रियतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. 15 नोव्हेंबर रोजी माओवाद्यांनी लोहरदगाच्या सेरेनडाग पोलीस ठाण्याच्या भागात पोलिसांचा खबऱ्या असल्याचे सांगत जगीर भगत नावाच्या व्यक्तीची हत्या केली. तर, 17 नोव्हेंबर रोजी लोहरदगाच्या पेशरार भागात एक पोकलँड आणि पूल बांधकामामध्ये आणलेला ट्रॅक्टर माओवाद्यांनी जाळला. त्याचबरोबर ठेकेदार मुन्शी कुंदन साहू यांचे अपहरण करून नंतर त्यांची हत्या केली होती.

हेही वाचा -मित्राशी गप्पा मारते म्हणून बहिणीला मारली गोळी; अल्पवयीन भावाला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details