महाराष्ट्र

maharashtra

7 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना मिळाले भारतीय नागरिकत्व

By

Published : Dec 20, 2019, 9:14 PM IST

गुजरातमधील कच्छमध्ये 7 पाकिस्तानी शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे.

हिंदू शरणार्थीं
हिंदू शरणार्थी

नवी दिल्ली -नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहेत. तर गुजरातमधील कच्छमध्ये 7 पाकिस्तानी हिंदू शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात आले आहे. याची माहिती भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी टि्वट करून दिली आहे.

भाजपचे महासचिव मनसुख मांडविया यांनी पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींची भेट घेतली. '7 शरणार्थींना भारतीय नागरिकत्व दिले आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे या लोकांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे या लोकांच्या जीवनात एक नवीन पहाट आली आहे, असे मांडविया यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

देशामध्ये नागरिकत्व सुधारणा काद्याविरोधात आंदोलन सुरू असून अनेक हिंसेच्या घटना घडत आहेत. दिल्ली, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह देशातील अनेक राज्यांत आंदोलन चिघळले आहेत. उत्तर प्रदेशमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा -CAA protest: उत्तरप्रदेशात हिंसक आंदोलनात ५ जणांचा मृत्यू; तर ८ जण गोळीबारात जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details