गोवा -बुधवारी गोवा काँग्रेसचे १५ पैकी १० आमदार सत्ताधारी भाजप पक्षात सामिल झाले आहेत. गोव्यातील परिस्थितीवर भाष्य करताना मनोहर पर्रिकरांचे जेष्ठ सुपुत्र उत्पल पर्रिकरांनी पक्षावर टीका केली आहे.
उत्पल पर्रिकरांची भाजपवर टीका; म्हणाले, ही माझ्या वडिलांची विचारधारा नाही - विचारधारा
उत्पल पर्रिकर म्हणाले, माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने दुसरा मार्ग त्यांच्या विचारधारेविरुद्ध एकदम उलट मार्ग स्वीकारला आहे.
उत्पल पर्रिकर म्हणाले, माझ्या वडिलांच्या निधनानंतर पक्षाने त्यांच्या विचारधारेविरुद्ध एकदम उलट मार्ग स्वीकारला आहे. वडील पक्षात असताना पक्षात नितिमूल्ये पाळली जात होती. परंतु, १७ मार्चला त्यांचे निधन झाल्यानंतर या विचारधारांचा आणि नितीमुल्यांचाही अंत झाला. परंतु, गोवावासियांना याबद्दल बुधवारी माहीत झाले आहे.
भाजपमध्ये सामिल झालेले आमदार आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामिल झाल्यानंतर ४० जागांच्या विधानसभेत भाजपचे संख्याबळ २७ जागांवर पोहोचले आहे. २०१७ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होता. परंतु, काँग्रेसकडे आता फक्त ५ आमदार राहिले आहेत.