पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. मागील काही दिवसांपासूनच त्यांच्या तब्येतीवरुन दिवसभर प्रचंड अफवा पसरल्या होत्या. आज पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. पर्रिकर गेल्या अनेक दिवसांपासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाने त्रस्त होते.
'सर्जिकल स्ट्राईक' करुन पर्रीकरांनी घेतला होता उरी हल्ल्याचा बदला
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन झाले आहे, अशी माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
पर्रीकरांनी केला होता सर्जिकल स्ट्राईक-
भारतात झालेल्या सर्जिकल स्ट्राईकचेसंपूर्ण श्रेय हे मनोहर पर्रिकर यांना जाते. उरी हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट पसरलीहोती. त्यामुळे जनतेमध्ये निराशा होती, पण सर्जिकल स्ट्राईकमुळे ही निराशा दूर झाली. सर्वांनी हे लक्षात घेतलेपाहिजे की, सरकार सगळे निर्णय घेत असते. सर्जिकल स्ट्राईक जेव्हा घडले त्या रात्री मी झोपू शकलो नाही. ती रात्र खूप तणावपूर्ण होती, असा अनुभवही पर्रीकरांनी त्यावेळी त्यांनी सांगितला होता.