मंगळुरू - कर्नाटकमधील मंगळुरू शहरात एका २२ वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. युवकाने महिलेला प्रपोज केले होते. परंतु, महिलेला त्याला नकार दिला. यामुळे रागावलेल्या युवकाने महिलेचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना तिथे उपस्थित असलेल्या एकाने मोबाईलवर रेकॉर्ड केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
एकतर्फी प्रेमातून वेड्या झालेल्या तरुणाचा महिलेवर चाकूने हल्ला, पाहा व्हिडिओ - व्हिडिओ
आरोपी युवक आणि महिलेत काही वेळ चर्चा झाली. परंतु, थोड्याचवेळात युवकाला राग अनावर होताच त्याने चाकूने महिलेवर वार केले.
आरोपी युवक आणि महिलेत काही वेळ चर्चा झाली. परंतु, थोड्याचवेळात युवकाला राग अनावर होताच त्याने चाकूने महिलेवर वार केले. यादरम्यान, काही प्रत्यक्षदर्शींनी त्याला महिलेवर वार करण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, रागाला गेलेल्या युवकाने कोणाचेही ऐकले नाही. युवक महिलेवर वार करतच राहिला. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली. उपस्थितांनी महिलेवर वार करताना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर युवकाने प्रत्यक्षदर्शींना धमकावताना स्वत:च्या गळ्यावरही चाकूने वार केला. यामध्ये हल्लेखोर युवक गंभीर जखमी झाला आहे.
प्रत्यक्षदर्शीनी रुग्णवाहिकेला फोन करत दोघांना जखमी अवस्थेत के.एस हेगडे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी भरती केले. मंगळुरू शहर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे.