महाराष्ट्र

maharashtra

गावातील लोकांनी विरोध दर्शवल्यामुळे 'तो' दोन दिवस जंगलातच राहिला

By

Published : Jun 7, 2020, 9:12 AM IST

चेन्नईहून ओडिशातल्या गंजम जिल्ह्यात परतलेल्या मजुराला दोन दिवस जंगलात वास्तव्यास रहावे लागल्याचा प्रकार घडला आहे. गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांनी त्याला गावात घेण्यास आणि क्वारंटाईन करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर बारिक नायक या व्यक्तीवर अन्न पाण्याशिवाय जंगलात राहण्याची वेळ आली.

odisha
''गावातील लोकांनी विरोध दर्शवल्यामुळे दोन दिवस जंगलातच राहिलो''

भुवनेश्वर (ओडिशा) -चेन्नईहून ओडिशातल्या गंजम जिल्ह्यात परतलेल्या मजुराला दोन दिवस जंगलात वास्तव्यास रहावे लागल्याचा प्रकार घडला आहे. गावातील सरपंच आणि इतर गावकऱ्यांनी त्याला गावात घेण्यास आणि क्वारंटाईन करून घेण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर बारिक नायक या व्यक्तीवर अन्न पाण्याशिवाय जंगलात राहण्याची वेळ आली.

गावातील लोकांनी विरोध दर्शवल्यामुळे 'तो' दोन दिवस जंगलातच राहिला

बारिक नायक हा ओडिशातील नागरिक चेन्नईमध्ये मजुरी करत होता. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे त्याने घरी येण्याचे ठरवले. त्यामुळे त्याने चेन्नईहून बालसोरपर्यंत रेल्वेने प्रवास करून घर गाठले. मात्र, त्याला गावातील सरपंचाने विरोध केला असल्याचे नायक याने सांगितले आहेत. त्यानंतर पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर सानाकोडना येथे पोलिसांनी त्याला क्वारंटाईन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details