नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लोकांना घरातून बाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली असतानाही गुन्हे होण्याचं काही थांबत नाही. मध्य प्रदेशमध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पैसे देण्यास नकार देणाऱ्या जन्मदात्रीची तरुणाकडून हत्या.. मध्यप्रदेशमधील घटना - मध्य प्रदेश
मध्य प्रदेशमध्ये एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
कमलेश कोल असे आरोपीचे नाव असून त्यांने आपल्या 75 वर्षीय आईची पैसे न दिल्याने एका स्टीकने मारहाण करून हत्या केली आहे. सुंदी कोल असे महिलेचे नाव आहे. आरोपी गेल्या कित्येक दिवसांपासून आईकडे पैसै मागत होता. मात्र, ती नेहमी त्याला पैसै देण्यास नकार देत होती. त्यावरून त्याच्याच वाद पेटला आणि आरोपीने स्टीकने सुंदी कोल यांच्यावर वार केले आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून कमलेशने गुन्हा कबूल केला आहे. जन्मदात्री आईचा खून केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.